नॅशनल ह्युमन राईटसच्या प्रदेश कार्यालयाचे आज उद्घाटन
खामगाव: राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटन न्यू दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन आज रविवार१२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता गोपाळकृष्ण सोसायटी,शेगाव रोड येथे आयोजित केले आहे.
कार्यालयाचे उद्घाटन विकाससूर्य राणा दिलीपकुमार सानंदा यांच्याहस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलिस निरिक्षक रामकृष्ण पवार राहतील. तर प्रमुख उपस्थितीत रक्मिणीकांत वाझुळकर, अमित कांबळे, रघुनाथ गायकवाड,राजेंद्र सोनार, विकास भगत, चंद्रकांत शिंदे, हिरालाल राजपूत यांची राहील. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नॅशनल ह्युमन राईटसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रतीभा जगदाणे पाटील यांनी केले आहे.
إرسال تعليق