आरटीई मोफत प्रवेशाची २५ टक्क्याची मर्यादा वाढवून ४० टक्के करण्यात यावी
गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाची मागणी ; शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन
खामगाव प्रतिनिधी:आर.टी.ई. (राईट टु एज्युकेशन) कायद्यातील कलम १२(१) सी नुसार खासगी विना अनुदानीत शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्याचा प्रवेश स्तर २५ टक्क्याहून ४० टक्के प्रवेश स्तर राखीव करावा या मागणीचे निवेदन १ जानेवारी रोजी राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांना गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
सदर निवेदनात नमूद केले आहे की,आर.टी.ई. कायद्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्याची तरतुद आहे. या कायद्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विना अनुदानीत शाळेत इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत प्रवेश देण्यात येतो व या विद्यार्थ्यांची संपूर्ण शालेय फी शासनामार्फत भरण्यात येते. महाराष्ट्रातील नगर परिषद, पंचायत समिती च्या माध्यमाने मराठी प्राथमिक शाळा मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असाक्षरतेचे प्रमाणात वाढ होत आहे.
खाजगी विना अनुदानीत शाळांची भरमसाठ वाढलेली फी पालकांना महागाईच्या काळात पुरत नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात यात तिळमात्रही शंका नाही. एकीकडे महाराष्ट्रातील शेतमालाला कवडीमोल भाव आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेला आहे. शासनाच्या मराठी शाव्य मोठ्या प्रमाणात बंद झाल्यामुळे नाईलाजास्तव पालकांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाने एखादी मोफतची योजना बंद करुन शाळेतील विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण विषयाकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या आर.टी.ई. कायद्यातील कलम १२(१) सी नुसार खासगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल याकरीता आर.टी.ई. कायद्यातील या कलमामध्ये बदल करुन २५ टक्क्याऐवजी ४० टक्के प्रवेश स्तर राखीव करण्यात यावा असेही नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या सहीने पाठविण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती
राज्याचे महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री, अजित पवार यांना पाठविण्यात आल्या आहेत. l
إرسال تعليق