हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त टावर चौकाचे नामकरण करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक करण्यात आले
खामगाव जनोपचार न्यूज:- हिंदुत्वाचे श्वलंत उदाहरण सरसेनापती शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शिवसेनेच्या वतीने खामगाव मधील प्रसिद्ध असलेले टावर चौकाचे नामकरण करून हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले,शिवसेनेच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना नामकरण मागणी पत्र सुद्धा देण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी सात वाजता चौकामध्ये नाम फलक लावून पूजन करून फटाक्याच्या अतिशबाजी करून नामकरण सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय आवताडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे, युवासेना शहर प्रमुख राहुल कळमकार, युवासेना उपजिल्हा प्रमुख निलेश देवताळू,बाळू खडसे पाटील,विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख नितेश खरात, विद्यार्थी सेना शहर प्रमुख विक्की सरवान, वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख पंकज अंबारे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री ताई देशमुख,शहर प्रमुख वैशाली ताई घोरपडे, उपशहर प्रमुख पौर्णिमा ताई जाधव,युती शहरप्रमुख रेणुका ताई जाधव, महिला आघाडी च्या प्रियंका ताई शुभम बराटे,महिला आघाडी उप तालुका प्रमुखसुवर्णाताई अरुण वानखेडे,संध्या ताई भगवान काळबागे,महिला आघाडी उपतालुका प्रमुख ज्योतीताई भगवान बुजाडे,विभाग प्रमुख गणेश ढगे, देवा भाऊ खराबे,विभाग प्रमुख गोपाल शेळके, घाटपुरी शाखाप्रमुख गोपाल चव्हाण,रामा ठाकरे,विशाल घुले,रुपेश तायडे,मंगेश इंगळे,शिव वाहतूक सेना तालुका संघटक सिद्धार्थ निर्मळ,अमोल खिरडकर, दिपक चंद यांचे सह शिवसैनिक उपस्थित होते.
إرسال تعليق