जिजाऊ स्कूल  ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्यूनिअर कॉलेज आवार येथे क्रांतीज्योती जयंती साजरी

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आज दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी जिजाऊ स्कूल  ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्यूनिअर कॉलेज आवार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 



      यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रामकृष्ण द.गुंजकर सर तसेच  संस्थेचे सचिवा सौ.सुरेखाताई रामकृष्ण गुंजकर मॅडम यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.                                                                            

  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्तितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली त्यांचे विचार समाजासाठी प्रेरणा देणारे आहे. असे विचार सौ.सुरेखाताई रा. गुंजकर  मॅडम यांनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.त्यानंतर शाळेतील सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेत्तर महिला सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रा.देविदास जाधव सर ,उपमुख्याध्यापक श्री.संतोष अल्हाट सर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर सहकारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم