खामगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी  किशोरआप्पा भोसले पुन्हा विराजमान

स्वाभिमानी प्रगती पॅनलचे ७ पैकी ६ उमेदवार विजयी ः टॉवर चौकात विजयाचा जल्लोष

खामगाव ः जनोपचार न्यूज नेटवर्क:-  पत्रकारांची मातृसंस्था व प्रतिष्ठीत संघटना म्हणून नावाजलेल्या खामगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा किशोरआप्पा भोसले बहुमताने विजयी झाले. दोन पॅनलमध्ये झालेल्या या लढतीत स्वाभिमानी प्रगती पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवारांनी बाजी मारत विजय संपादन केला.

        खामगाव प्रेस क्लबची निवडणूक दि.२३ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक विश्राम गृह येथे झाली. यामध्ये स्वाभिमानी प्रगती पॅनलकडून अध्यक्षपदासाठी किशोरआप्पा भासले, उपाध्यक्ष नितेश मानकर, किरण मोरे, सचिव अशोक जसवाणी, सहसचिव मोहन हिवाळे, कोषाध्यक्ष आकाश पाटील, सहकोषाध्यक्ष मुबारक खान तर परिवर्तन पॅनल कडून अध्यक्षपदासाठी अमोल गावंडे, उपाध्यक्ष पदासाठी गजानन राऊत, मो.रियाज, सचिव अनिल गवई, सहसचिव संतोष करे, कोषाध्यक्ष महेंद्र बनसोड, सहकोषाध्यक्ष शिवाजी भोसले तसेच महेश देशमुख हे अध्यक्षपदासाठी निवडणुक रिंगणात होते. यामध्ये नेमलेल्या समितीने पारदर्शक भुमिका बजावत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेवून निकाल घोषित केला. यावेळी ७२ पैकी ७० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी किशोरआप्पा भासले हे सर्वाधिक ४४ मते घेवून विजयी झाले. तर उपाध्यक्षपदी नितेश मानकर व किरण मोरे, सचिवपदी अनिल गवई, सहसचिवपदी मोहन हिवाळे, कोषाध्यक्षपदी आकाश पाटील, सह कोषाध्यक्ष पदी मुबारक खान यांनी विजय मिळविला. यानंतर येथील टॉवर चौकात जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत डिजेच्या निनादात थिरकून जल्लोष साजरा करण्यात आला.

अध्यक्ष: किशोरआप्पा भासले - 44 - विजयी

अमोल गांवेड - 25 महेश देशमुख - 1

------------------------

उपाध्यक्ष

नितेश मानकर - 42 - विजयी 

गजानन राऊत - 27

कोरी पत्रिका - 1

---------------------------

उपाध्यक्ष

किरण मोरे - 36 - विजयी

मो.रियाज - 30

नोटा - 2

कोरी पत्रिका - 2

---------------------------

सचिव

अशोक जसवाणी - 34

अनिल गवई - 35 - विजयी

कोरी पत्रिका - 1

-----------------------------

सह सचिव

संतोष करे - 26

मोहन हिवाळे - 39 - विजयी

नोटा - 4

कोरी पत्रिका - 1

-----------------------------

कोषाध्यक्ष

महेंद्र बनसोड - 32

आकाश पाटील - 36 - विजयी

नोटा - 1

कोरी मतपत्रिका - 1

----------------------------

सहकोषाध्यक्ष

मुबारक खान - 35 - विजयी

शिवाजी भोसले - 33

कोरी मतपत्रिका - 1

नोटा - 1

-----------------------------



Post a Comment

أحدث أقدم