प्रेस क्लब खामगाव च्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कारांचे शानदार वितरण
मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांचे समर्थन- ना. फुंडकर
खामगाव :- जनोपचार न्यूज नेटवर्क :-पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण समारंभ प्रेस क्लब खामगाव (रजि. क्र. महा. ३२९/१९ एफ १८४३२) तर्फे सोमवार ६ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात साजरा करण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रेस क्लब खामगावच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचा मानाचा जिल्हा गौरव पुरस्कार श्री.दर्शनसिंह हरपालसिंग ठाकूर, शांतीदूत पुरस्कार रवी जोशी जिल्हा समाज भूषण पुरस्कार विनोद सुपर बाजारचे संचालक विनोद रमणलाल डिडवानिया, कै.बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील महत्त्वाचा व सन्माननीय पत्रकार मेहकर जयंत बाठिया , जिल्हा उद्योग पुरस्कार भीमसेन भगवदेवानी, जिल्हा कार्य गौरव पुरस्कार गौतम गवई, जिल्हा आदर्श नारी पुरस्कार माधुरी बोबडे, सुभाष मंत्री यांना स्व.गोवर्धनसेठ गोयंनका स्मृती पुरस्कार, सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन सीताराम पोतदार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.नितीश जगदीश अग्रवाल यांना वैद्यकीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. एड. आकाश फुंडकर, सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेडचे संस्थापक डॉ.नंदकिशोर पालवे, सामाजिक नेते अमोल अंधारे, नरहरी महाराज संस्थान भालेगाव बाजारचे पी. पं.प्रकाश महाराज मोरखडे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कुबेर मंदिराचे संस्थापक सुरेश नागेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सल्लागार छगनलाल खंडेलवाल होते.
कार्यक्रमाचे संचालन सचिव ईश्वरसिंह ठाकूर व लुकमान परवेझ, प्रस्ताविक अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राजकुमार गोयनका यांनी मानले. यावेळी सागर मोदी, जगदीश अग्रवाल, प्रल्हाद शर्मा, मंगेश तोमर, किरण मोरे, मुबारक खान, सूरज बोराखडे, बळीराम वानखेडे, अमोल गावंडे, शिवाजी भोसले, पंकज ताठे, आनंद गायगोळ, मोहम्मद फारुख, आकाश पाटील, मोनू शर्मा, मोनाली वानखेडे, मोहन हिवाळे, सुनील गुळवे, कृष्णा ठाकूर, केतन पेसोडे, मनोज नागरनाईक, अजय राजपूत, पत्रकार, व्यापारी व शेकडो मान्यवर उपस्थित होते.
मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांचे समर्थन – ना. फुंडकर:
शहरातील पत्रकारांशी माझे जवळचे नाते आहे. त्यांच्यामुळेच आज मी महाराष्ट्राच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकलो आहे. मी सदैव पत्रकारांच्या पाठीशी उभा आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार हे नेहमीच समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतात. त्यांना दरवर्षी नागरिकांनी दिलेला योग्य सन्मान कौतुकास्पद आहे.
إرسال تعليق