खामगाव नगरातील सर्व श्रीराम भक्त तथा हिंदु धर्मप्रेमी नागरीकांना सुचित करण्यात येते की *आपले आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांची श्री क्षेत्र अयोध्या येथील भव्य मंदिरात मागील 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली*
यावर्षी हिंदु तिथी प्रमाणे शनिवार दि. 11/01/2025 रोजी या प्राणप्रतीष्ठेच्या नेत्रदीपक सोहळ्याला 1 वर्ष पुर्ण होत आहे
विश्व हिंदू परीषद तर्फे सर्व श्रीराम भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की शनिवार दि 11 जानेवारीला आपण सर्वांनी या वर्धापण दिनी आपल्या जवळच्या कोणत्याही मंदिरात एकत्रीत येवुन राम नामा चा जप करावा, संकीर्तन करावे आणी सामुहिक आरती करून प्रसाद वितरण करावा तसेच सायंकाळी घराच्या बाहेर 5 दिवे लावून दिवाळी साजरी करावी
याशिवाय ज्यांना जे जे शक्य असेल त्यांनी विविध पद्धतीने वर्धापन दिनाचा आनंद साजरा करावा असे आवाहन विश्व हिंदू परीषद खामगाव तर्फे करण्यात आले आहे
إرسال تعليق