जेसीआय खामगाव जय अंबे चा शपथविधी सोहळा संपन्न एडवोकेट दिनेश वाधवानी यांनी घेतली अध्यक्ष पदाची शपथ
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नावाजलेली संस्था जेसीआय खामगाव जय अंबे वर्ष 2025 च्या नवीन कार्यकारणीचा शपथविधी सोहळा 15 जानेवारीला मोठ्या थाटामाटात प्रेम लान्स येथे पार पडला.सर्वप्रथम जेसी आस्था पठण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे ऍड अरुण टापरे खामगाव, ऍड मनीष सेवलानी भुसावळ, कीनोट स्पिकर निर्मल मुनोत अमरावती, झोन प्रेसिडेंट कुशल झवर, झेडविपी तथा शपथविधी अधिकारी ऍड कुणाल राठी, झेडविपी डॉ शालीनी राजपूत, प्रणेते डॉ भगतसिंग राजपूत, अध्यक्ष ऍड दिनेश वाधवाणी, सचिव डॉ आनंद राठी, कोषाध्यक्ष ऋषिकेश डिडवाणीया, ज्यू जेसी राधक परेश खत्री उपस्थित होते.मावळते अध्यक्ष डॉ गौरव गोयनका यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत मागीलवर्षी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. यानंतर रामभैेया मिश्रा, स्नेहील भैया, कृष्णा गोयनका, यश घुले,हर्ष गुप्ता,ऍड शशांक मुखिया, मेहर गणवानी, जानवी मोहनानी, आकाश अग्रवाल, शिल्पा अग्रवाल या नवीन जेसी सदस्यांनी झोन प्रेसिडेंट यांच्या हस्ते शपथ घेऊन संस्थेमधे प्रवेश केला. यानंतर मावळते अध्यक्ष डॉ गौरव गोयनका यांच्या कडून 2025 अध्यक्ष पदाकरिता ऍड दिनेश वाधवाणी यांनी शपथ घेतली. तत्पशात नवनियुक्त अध्यक्षांनी नवीन कार्यकारणीला ज्यामध्ये सचिव डॉ आनंद राठी, सहसचिव नम्रता लाटे, कोषाध्यक्ष ऋषिकेश डीडवानिया, सहकोषाध्यक्ष सुरभी गोयनका, ज्युनिअर जेसी चेअरपर्सन राधक परेश खत्री, उपाध्यक्ष मॅनेजमेंट योगेश खत्री, ट्रेनिंग डॉ कोमल गोयनका, कम्युनिटी डेव्हलपमेंट डॉ अनुप शंकरवार, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सीए आशिष मोदी, बिझनेस विशाल गांधी, पीआर मार्केटिंग सोनाली टिंबाडिया, डायरेक्टर मॅनेजमेंट रोहन जैसवाल, ट्रेनिंग मंगेश राऊत, कम्युनिटी डेव्हलपमेंट रचना बयस सलुजा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पुनम घवाळकर, बिजनेस देवांशी मोहता, पी आर अँड मार्केटिंग रोशन गनवाणी, तसेच स्पेशल ऑफिसर प्रोग्राम नीड ब्लड कॉल जेसी विन्नी मोहनानी, एम्पॉवरिंग युथ राहुल नोतानी, क्लीन प्लेट ड्राईव्ह सीए अपूर्व देशपांडे, इम्पॅक्ट 2030 गजानन जोशी, जेसीवीक कॉर्डिनेटर निष्ठा पूरवार जेठांनी, श्वेता अग्रवाल यांना शपथ दिली.
![]() |
जाहिरात |
यावेळी रितेश निगम, कौस्तुभ मोहता, मोना खत्री, डॉ चेताश्री शंकरवार, सुरभी मोदी, अमोल घवाळकर , यश घवाळकर, पिया घवाळकर, आकाश बुधवानी, डॉ अजिंक्य वराडे, निखिल लाठे, नम्रता लाठे, डॉ प्रतिमा राठी, डॉ कश्यप जैस्वाल, ऍड रश्मी जैस्वाल, करण डिडवानिया, पूर्वा डिडवानिया, कुणाल भिसे, ऍड राहुल पवार, श्रेणिक टिम्बाडिया, सुनील राठी, रोशन गणवानी सह सर्व सदस्य व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
अशी माहिती जेसी रोहन जैस्वाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली
إرسال تعليق