राजमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जयंतीची जय्यत तयारी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : येत्या 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीची तयारी संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे. त्यानिमित्त खामगाव येथील अमलापुर नाका भागातील राजमाता जिजाऊ चौकात जयंतीनिमित्त जयत सुरू आहे. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ सेवा समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने रंग भरून स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तदपूर्वी शहरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
إرسال تعليق