ठेवीवरील व्याजाची रक्कम कर्ज खात्यात जमा करणे भोवले
अग्रसेन पतसंस्थेच्या मुख्यप्रशासक व व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा
खामगाव : श्री अग्रसेन सहकारी पतसंस्था म. शेगाव शाखा खामगाव येथून गोपाल बाबुलाल अग्रवाल यांनी कर्ज घेतले होते. यावेळी संस्थेने कर्जाकरीता कोरे चेक व मुलासह दोघांची मुदत ठेव प्रत्येकी ५० हजार रूपये ठेवण्यास सांगीतले होते. गोपाल अग्रवाल व त्यांच्या मुलाने २२ मे २०१७ रोजी ६० महिन्याकरीता ५०-५० हजाराची रक्कम मुदत ठेव योजनेत ठेवली. दरम्यान पतसंस्थेने ६० महिन्यावरील रकमेवर व्याज न देता दोघांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देश्याने खोटे विड्रॉल फॉर्म तयार करून दोघांची पुर्वसंमती न घेता ठेवीवरील व्याज प्रत्येकी २२ हजार ५०० रूपये परस्पर कर्ज खात्यात जमा केली. दोघांचे खोटे दस्तऐवज तयार करून ४५ हजार रूपये व्याज कर्ज खात्यात जमा करून फसवणूक केली. याचाबत गोपाल अग्रवाल बांनी न्यायालयात खटला दाखल करून दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत मुख्यप्रशासक सुरेश श्यामसुंदर गाडोदिया रा. शेगाव व खामगाव शाखेचे व्यवस्थापक अनंत गजानन रंगदळे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले, खामगाव शहर पोलिसात दोघांविरूद्ध काल रात्री कलम ३१६ (२), ३९८(४), ३३० (२), ३३६ (३) ६१(२), भा. न्यास अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोउपनि राजेश गोमासे यांच्याकडे देण्यात आला आहे.
إرسال تعليق