खामगाव पोलिसांची पारखी नजर आणि कारवाई सुपर!

चावी बनवायला आला आणि जाळ्यात अडकला! नऊ मोटरसायकली जप्त

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-दुचाकीची चावी बनवायला खामगावात आलेल्या चोरट्याला खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अलगत ओळखले आणि झाला गाडी चोरींचा उलगडा. संशयीत म्हणून पकडलेल्या आरोपीने चक्क एकेक करता ९ दुचाक्या चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपीने नांदुरा, जलम, मुर्तीजापुर, भुसावळ येथून गाड्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Api भागवत मुळीक व Hc प्रदीप मोठे ,Npc सागर भगत Pc अंकुश गुरुदेव, Pc गणेश कोल्हे,pc राहुल थारकर, Pc रवींद्र कन्नर,Pc अमर ठाकूर यांनी केली ही मोठी कारवाई
 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29/12/2024 रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार आर. एन. पवार यांच्या आदेशाने Api भागवत मुळीक व Hc 1111 प्रदीप मोठे ,Npc 2420 सागर भगत Pc 760 अंकुश गुरुदेव, Pc 44 गणेश कोल्हे,Pc 1720 राहुल थारकर, Pc 2295 रवींद्र कन्नर,Pc 112 अमर ठाकूर असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना आरोपी नामे रुपेंद्र नरसिंह पठ्ठे रा. संत रोहिदास नगर मलकापूर हा मोटर सायकलची चावी बनवत असताना मिळून आल्याने त्याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यामध्ये  MH 04 KY 7256 या नंबरची युनिकॉर्न मोटरसायकल ही भुसावळ रेल्वे स्टेशन जवळून त्याने चोरी केली .असल्याचे दिसून आले. म्हणून त्याच्याकडे अधिक विचार करता त्याने नांदुरा रेल्वे स्टेशन परिसरात तीन मोटरसायकल लावून ठेवल्या असल्याचे सांगितले. तपासा दरम्यान आरोपीकडून एकूण 09 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. 

 सदर आरोपी यास खामगाव शहर पोलीस स्टेशन cr no. 189/2024 IPC 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून आरोपी यास दिनांक 04.01.2025 पर्यंत PCR मंजूर आहे. वरील मोटरसायकल नांदुरा, जलम, मुर्तीजापुर, भुसावळ अशा विविध ठिकाणावरून चोरी गेल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ प्रदीप मोठे हे करीत आहेत

     सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे सर , मा. अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री थोरात सर , मा. एस डी पी ओ खामगाव श्री ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم