एकनिष्ठा फाउंडेशनला मिळाला विर बिरसा मुंडा अंतरराष्ट्रीय रक्तक्रांती सम्मान
खामगांव (जनोपचार न्यूज नेटवर्क):- कालचिनी न्यु अलीपुरद्वार (पश्चिम बंगाल) कालचिनी येथे आयोजित विर बिरसा मुंडा अंतरराष्ट्रीय रक्तक्रांती सम्मान समारोहचे आयोजन करण्यात आले होते. या सम्मान समारोह मध्ये नेपाल, भूटान, ताईवान, मालदीव, नागालँड, सह भारत देशातील विभिन्न राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थाचा सम्मान करण्यात आला.
![]() |
जाहिरात |
या रक्तक्रांती समारोह मध्ये एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन खामगांव महाराष्ट्रला उत्कृष्ठ गौ - सेवा रक्तसेवा कार्याची दखल घेऊन दुआर्स रक्तमित्र परिवार तर्फे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव , बुलढाणा जिल्हा संयोजक दिपक खैरे , हरीष पंजवानी या तिन्ही लोकांचा सत्कार सी आय डी ऑफिसर संजुकता चटर्जी, कारगिल योद्धा मेजर दलजीत सिंग, शतकवीर रक्तदाता ब्रजेश सिंग, सम्मान समारोहचे संयोजक रंजीत मिश्रा यांच्या हस्ते मेडल शिल्ड प्रमाणपत्र दुपट्टा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. पश्चिम बंगाल येथे रक्तदान शिबिरा मध्ये सुरजभैय्या यादव यांनी रक्तदान केले व तसेच पश्चिम बंगाल येथे अयोजीत रक्तदान महादान रैलीत सहभाग घेऊन भारत माता की जय, वंदेमातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्रचा जयघोष देत नागरिकां मध्ये जनजागृती केली या रैली मध्ये विदेश सह भारत देशातील प्रत्येक राज्यातील शेकडो सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अशी माहिती दिपक खैरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
إرسال تعليق