दादांबद्दलची आपुलकी नेत आहे नागपुरात ......

ना. आकाशदादा फुंडकरांच्या अभिनंदनासाठी स्नेहीजनांना लागले नागपूरचे वेध !

खामगांव-जनोपचार न्यूज नेटवर्क :- आपले आमदार नामदार झाल्याने कार्यकर्ते, हितचिंतक, स्नेहीजनांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून ना. आकाशदादा फुंडकर यांना भेटून त्यांचे स्वागत करण्यासाठी मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नागपूरचे वेध लागले असून दररोज अनेक जण नागपूर येथे जाऊन आपल्या मंत्री महोदयांचे अभिनंदन करत आहेत.

खामगाव मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने खामगाव मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून ना. आकाशदादांना भेटण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आतुर झालेले आहेत. ना. फुंडकर यांच्या शपथविधी सोहळ्याला असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते कुडकुडत्या थंडीत नागपूरला गेले होते. त्याच प्रमाणे त्या दिवसापासून दररोज खामगाव मतदार संघासह जिल्हाभारतील पदाधिकारी, कार्यकर्ते व स्नेहीजन नागपूर येथे जाऊन आपल्या मंत्री महोदयांना भेटून त्यांचे अभिनंदन करत आहेत.

 कार्यकर्त्यांचा हा स्नेह पाहून ना. आकाशदादा भारावून गेले असून ते सर्वांशी आपुलकीने बोलून त्यांचे स्वागत स्वीकारत आहेत. भेटीला आलेल्या प्रत्येकाशी ते वैयक्तिक संवाद साधून त्यांचे आभार व्यक्त करीत आहेत. एखाद्या मंत्र्याला भेटण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असल्याचे चित्र नागपूर विधान भवन परिसरात विरळच दिसून येत आहे


.

Post a Comment

أحدث أقدم