तहसील कार्यालयाचा कारभार म्हणजे "चहा पेक्षा केटल्या गरम"? दलालांचा सुळसुळाट: आमदार आकाश दादा फुंडकर यांनी लक्ष देण्याची गरज
खामगाव नितेश मानकर:-खामगाव तहसील कार्याच कारभार म्हणजे चहा पेक्षा कॅटला गरम असा झाला असून तहसीलदार पाटील यांची कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची चर्चा आता समोर येत आहे. साहेबांचा फोन कधीही recived होत नसल्याने नागरिकांनी आता जावे तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद्द जनोपचारने देखील तहसीलदार पाटील साहेब यांना कॉल केला परंतु त्यांनी कॉल रिसीट केला नाही त्यानंतर जनोपचार नेही तहसीलदार साहेब यांना व्हाट्सअप वर पुरायानिशी सादर केलेल्या कागदपत्र व्हिडिओ नंतरही कोणतीही कारवाई केल्याचे समोर आले नाही.
नुकताच एक मोठा गंभीर प्रश्न समोर आला असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालक रुग्णाना सर्टिफिकेट देण्याकरिता या कार्यालयातून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ मिळतो . या प्रमाणपत्रासाठी बालक रुग्णाचे नातेवाईकांनी तहसील कार्यालयाच्या चक्रा सुरू केल्या. येथील पुरवठा अधिकारी यांचा मनमारीन कारभार तहसीलदार पाटील यांच्या कानावर आल्यावर देखील त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने तहसीलदार त्यांना पाठीशी घालत असल्याची ओरडही आता ऐकिवात आहे. शिरला नेमाने येथील रुग्ण सध्या गंभीर परिस्थितीत एका रुग्णालयात उपचार घेत आहे त्या ठिकाणी शासनाने निर्गमित केलेल्या नियमानुसार त्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता मात्र पुरवठा अधिकाऱ्यांनी तो अर्ज फेटाळून लावत रुग्णाच्या नातेवाईकाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला याच कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात आले होते मात्र त्याला संबंधित पुरवठा अधिकारी यांनी फाडून टाकला. याच कार्यालयातील नायब तहसीलदार पाटील यांनी तो प्रमाणित केलेला अर्ज जनोपचारने आपल्या कॅमेरात कैद केला आहे तो अर्ज वाचकांना आम्ही दाखवत आहे. यावर तहसीलदार काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागून आहे
إرسال تعليق