त्या घटनेचा वंचित करून निषेध!
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क :- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या मार्फत आज १४ डिसेंबर २४ रोजी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नमूद केले आहे की, परभणी येथे काही समाजकंटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक शिल्पाची तोडफोड करून विटंबना केली.
या घटनेचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींना सोडून काही निरपराधांना अटक केली आहे, असा आरोप निवेदनात केला आहे. खऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर शरदभाऊ वसतकार, जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे, अॅड. अनिल इखारे, विशाखाताई सावंग, धम्मपाल नितनवरे, गौतम सुरवाडे, दिनेश इंगोले, गौतम नाईक आर्दीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
إرسال تعليق