41 फूट हनुमान ट्रस्टच्या वतीने 8 जानेवारी रोजी मोफत आरोग्य उपचार शिबिर

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक 41 फूट हनुमान ट्रस्ट बाळापूर रोडच्या वतीने दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत मोफत आरोग्य उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दमा अस्थमा नेहमी सर्दी होणे अशा रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात येणार आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध थेरपीस्ट तज्ञ डॉक्टर श्री राम व डॉक्टर श्री विजय कोळी हे रुग्णांची तपासणी करणार असून शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

أحدث أقدم