ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर रविवारपासून रुग्णसेवेत 

 सुसज्ज, अद्ययावत  सुविधांसह जटील आजारावर होणार उपचार, 24 तास सेवा उपलब्ध 



खामगाव ः जनोपचार न्यूज नेटवर्क :-  येथील डॉ.निखील संजय ठाकरे व डॉ. सौ. पूजा निखिल यांच्या ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअरचा शुभारंभ रविवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प.पू.शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. ठाकरे परिवार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून आता वैदकीय क्षेत्रात सुध्दा यशस्वी पाऊल ठेवले आहे. रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हा मुलमंत्र जपत रूग्णांना निस्सीम भावनेने वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प ठाकरे परिवाराने केला आहे.

             शहरातील जावंधिया कॉम्प्लेक्सच्या बाजुला, सिव्हिल लाईन केला नगर येथे सुसज्ज सुविधांसह ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअरची सुरूवात होत आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ.निखिल संजय ठाकरे एम.बी.बी.एस (एम.डी) डी.टी.एम.एच , सीपीएस (मेडीसिन),(एफ.आई.सी.एम)(एफ.आई.डी.एम) ,पी.जी डिप्लोमा कार्डियोलॉजी  कंसलटेंट इंटेंसिव केयर फिजिशियन , कार्डियोलॉजिस्ट , डायबेटोलॉजिस्ट तसेच  डॉ.सौ. पूजा  निखिल ठाकरे एम.बी.बी.एस., एम.एस. कंसलटेंट गायनेकोलॉजीस्ट (प्रसुति व स्त्री रोग तज्ञ) ह्या वैद्यकीय सेवा देणारे आहेत. ठाकरे हॉस्पिटलमध्ये डिफिब्रीलेटर, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज अतिदक्षता विभाग, वेंटीलेटर,  मल्टी पॅरामॉनीटर, डिजीटल एक्स-रे, इ.सी.जी.,  फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेची तपासणी (PFT),  दुर्बीणध्दारे फुफ्फुस परीक्षण, अॅलर्जी टेस्टींग सेंटर, निद्रारोग तपासणी, डिलक्स/A.C. रुम्स,  सर्व तज्ञ डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध असतील. तसेच कार्डियाक ॲम्बुलन्स 24 तास उपलब्ध राहील.  

Advt.

हॉस्पिटलमध्ये उपचार,दमा, अस्थमा, ओलर्जी, सी.ओ.पी.डी, बालदमा व अॅलर्जी न्युमोनीया, स्वाईन फ्लु व इतर संसर्गजन्य आजार, क्षयरोग निदान व उपचार, श्वसनक्रिया निकामी होणे (रेस्पीरेट्री फेल्यूअर), रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार,डेंग्यू, मलेरिया, टायफाईड व इतर ताप, मेंदूज्वर, लकवा, मिरगी,विषबाधाअतिसार, अॅसिडीटी व पोटाचे विकार पेशी कमी होणे व रक्तासंबंधी आजार, निद्रारोग व घोरण्याचे यावर उपचार होतील. तसेच डॉक्टर पूजा निखिल ठाकरे या सुद्धा प्रसूती आणि महीलांच्या अन्य आजारांवर उपचार करणार आहेत.रविवार ता.१५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जागृती आश्रम शेलोडी येथील प.पू.शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती सीमा संजय ठाकरे, स्वप्निल संजय ठाकरे, सौ.मीनल स्वप्निल ठाकरे, डॉ.निखिल संजय ठाकरे, डॉ.सौ.पुजा निखिल ठाकरे व ठाकरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ निखिल ठाकरे यांना दीर्घ अनुभव

 कनिष्ठ निवासी दीनदयाल उपाध्याय सरकारी रुग्णालय, दिल्ली,  माजी आयसीयू रजिस्ट्रार आकाश हेल्थकेअर, दिल्ली,  माजी आयसीयू रजिस्ट्रार किंग्सवे हॉस्पिटल नागपूर, माजी आयसीयू रजिस्ट्रार व्यंकटेश्वर हॉस्पिटल, दिल्ली, माजी DTMH CPS मेडिसिन निवासी CPS मुंबई, माजी ER वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर येथे उपस्थित,  जेआर डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, नवी दिल्ली अशा प्रसिद्ध संस्थांमध्ये डॉ. निखिल ठाकरे यांनी वैद्यकीय सेवा दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم