आकाश फुंडकरांमुळे खामगावातील उद्यानांचा कायापालट : पुरोहित

भाजपच्या संवाद प्रचार रॅलीला ठिकठिकाणी प्रतिसाद

खामगाव : शहरातील नादुरुस्त बगिचांच्या दुरुस्तीसोबतच नाना-नानी पार्कसह विविध प्रभागातील ४० पेक्षा अधिक बगिचांच्या निर्मिती आणि सौंदर्यीकरणासाठी आकाश फुंडकर यांनी तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी खेचून आला. दूरदृष्टी आणि शाश्वत विकासामुळेच शहरातील उद्यानांचा कायापालट होत असून खामगाव शहर हे गार्डन सीटी म्हणून नावारूपाला येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी शेखर पुरोहित यांनी केले.

हिरवळीवर दिल्या जातोय भर : भाग्यश्रीताई मानकर
शहरात पूर्वी नटराज गार्डन आणि टॉवर गार्डन या दोनच उद्यानांची ओळख होती. मात्र, वैकुंठवासी भाऊसाहेब फुंडकर यांच्या संकल्पनेतील नाना- नानी पार्कला मूर्त रूप देण्यात आले. त्याचप्रमाणे रायगड कॉलनी भागात सावरकर उद्यान, छकुली गार्डन, वामन नगर पाण्याच्या टाकीजवळ नवीन उद्याने तयार करण्यात आली. चांदे कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिर, गोविंदनगर, मुक्तानंदनगर, अभयनगर, बर्डे प्लॉट, रंभाजी कॉलनी, यशोदानगरी, राम मंदिर परिसरात आकाश फुंडकर यांनी उद्यानासाठी भरघोस निधी दिला. हिरवळीवर भर दिल्या जात असल्याने मातृशक्तीसाठी ही उद्याने आरोग्यदायी ठरत असल्याचे नगर परिषदेच्या माजी सभापती भाग्यश्रीताई मानकर यांनी सांगितले.

खामगाव शहरातील विविध प्रभागात आकाश फुंडकरांकडून संवाद रॅली काढण्यात येत आहेत. या रॅलीदरम्यान आयोजित छोटेखानी संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी पुरोहित म्हणाले की, कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात नाना-नानी पार्क, छकुली बाल उद्यान, सावरकर उद्यान यासह तब्बल ४० बगिचांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे, तर काही उद्यानांचे सौंदर्यीकरण प्रगतिपथावर आहे. शहरातील तब्बल ४० उद्यानांच्या सौंदर्यीकरणासाठी आकाश फुंडकरांनी १२ कोटींचा निधी खेचून आणला. त्यामुळे संपूर्ण शहरात हिरवळ आणि ऑक्सिजन झोन तयार होत असून नागरिकांसाठी ही उद्याने आरोग्यदायी ठरताहेत, असेही पुरोहित यांनी यावेळी सांगितले. या रॅलींना मातृशक्तीसह सामान्य नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे.

विविध उद्यानांचे पालटले रुपडे

शहरातील टाॅवर गार्डन, महात्मा गांधी उद्यानाचे रुपडे पालटले आहे. दरम्यान, गजानन कॉलनी, जिजाऊ पार्क, यशोधरा नगरी यासह शहरात विविध ४० ठिकाणी नवीन उद्यानांची निर्मितीची कामे प्रगतिपथावर असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم