ग्रामीण भागातही भाजपच वरचढ
खामगाव मतदारसंघात भाजप महायुतीला सर्वाधिक ४८.३६ टक्के मतदान झाले असून शहरासह खामगाव ग्रामीण व शेगाव ग्रामीणमध्येही भाजपच वरचढ असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीकरिता बुथ रचना करण्यात आली होती. यामध्ये १ ते ५२ बुथ शेगाव ग्रामीणमध्ये असून ५३ ते १०२ व १८१ ते ३२२ असे १९२ बुथ खामगाव ग्रामीणमध्ये आहेत. तर १०३ ते १८० असे ७८ बुथ खामगाव शहरात असून, शेगाव ग्रामीणमध्ये भाजपला ५ हजार ३९२ मतांचा मोठा लीड आहे. त्याचप्रमाणे खामगाव ग्रामीण विभागातही भाजपला १२ हजार १०४ मतांची आघाडी असून मतदारसंघातील तिन्ही विभाग मिळून भाजपला एकंदरीत २५ हजार ५१३ मतांची आघाडी असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरूनच दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेगाव ग्रामीण विभागात काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना ३८०० चा लीड मिळालेला होता.
إرسال تعليق