जय हिंद लोकचळवळीच्या पुढाकाराने शंभर कुटुंबांची दिवाळी झाली गोड
खामगाव : जय हिंद लोक चळवळीच्या वतीने दिवाळीनिमित्त 100 गरीब कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. दिवाळी सणाला लागणारे सर्व अत्यावश्यक फराळाचे साहित्य जयहिंद च्या वतीने मिळाल्याने या कुटुंबांची दिवाळी गोड झाली.
आदर्श जनप्रतिनिधी आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळीच्या वतीने सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवल्या जात आहेत. यावर्षी दिवाळीच्या निमित्त जय हिंद लोक चळवळीच्या वतीने शंभर गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणाला विविध प्रकारचे फराळ बनवण्याची परंपरा आहे. हे सर्व फराळाचे साहित्य जयहिंद लोक चळवळीच्या वतीने गरजू कुटुंबांना देण्यात आले. जय हिंद लोकचळवळीचे जिल्हा समन्वयक स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.
إرسال تعليق