प्रभाग १ मध्ये दिल्या जाते स्वच्छतेला महत्त्व !

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला स्वच्छतेचे आवाहन केले आहे. यामुळे "स्वच्छ खामगाव ,सुंदर खामगाव" असा नारा देत पालीका ने देखील स्वच्छतेवर भर टाकला आहे. आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी असावा या संकल्पनेतून प्रभाग १ च्या  माजी नगरसेविका सौ भाग्यश्रीताई मानकर ह्या त्या प्रभागातील कर्मचाऱ्यांकडून नियमित साफसफाई करिता प्रयत्न रत आहेत



. दैनंदिन साफसफाई हा त्यांचा प्रमुख प्रयत्न आहे. या प्रभागात दोन स्वच्छ बगीचे असून या बगीचात बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत दररोज येत असतात. त्या ठिकाणी त्यांना मोकळी हवा मिळते. बालकांना खेळणी असल्यामुळे ते देखील मोठ्या आनंदाने यापैकी त्यामध्ये आपला समय व्यतीत करतात. येणारा काळातही अशीच सेवा देण्याचा संकल्प माजी नगरसेविका सौ भाग्यश्री मानकर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم