लॉयन्स इंटरनॅशनलच्या सुचनेनुसार पीस पोस्टर स्पर्धेत मुलांच्या अनोख्या कलेचे प्रदर्शन
खामगाव - लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे गुरूवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सावरकर उद्यान, रायगड कॉलनी खामगांव येथे वीर सावरकर उद्यान, खामगांव येथे पीस पोष्टर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या वर्षीच्या पीस विदाऊट लिमिटस् या थीमवर आधारित या स्पर्धेत ११ ते १३ वर्षे वयोगटातील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतुन शांततेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांची नांवे पुढीलप्रमाणे, हितवी मयुर शाह, किया मयुर शाह, अश्वीन वानखेडे, निधी देशमुख, पिहू बसवाणी, घनिश डहाके, अक्षिता मयुर टिबडेवाल यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून विनय देशमुख आणि शिरीष निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे मुल्यमापन केले. लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीचे १३ सदस्य आणि अनेक पालक उपस्थित होते. ज्यामध्ये प्रदेश अध्यक्ष लॉ. सुरज अग्रवाल, झोन चेअरपर्सन उज्वल गोयनका, अध्यक्ष शैलेश शर्मा, कोषाध्यक्ष गजानन सावकार, जेष्ठ सदस्य अशोक गोयनका, अजय अग्रवाल, अभय अग्रवाल आणि जीएलटी समन्वयक नरेश अग्रवाल यांचा समावेश होता. या स्पर्धेत जेष्ठ सदस्य लॉ. अशोक गोयनका यांनी सर्व मुलांना २०० रूपये बक्षीस म्हणून दिले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच अक्षिता मयुर टिबडेवाल हिला तिच्या अनोख्या कलेसाठी विशेष कामगिरी पुरस्कारासह अचिव्हमेंटनट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुलांचे पालकही उपस्थित होते. वरील माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
إرسال تعليق