मुंबई हुन अपहरण झालेल्या चिमुकली सह अपहरणकर्ता शेगाव आरपीएफ च्या ताब्यात


याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी 03 वाजता एक 11 वर्षीय चिमुकली एका 22 वर्षाच्या युवका सोबत शेगाव स्टेशन वर संशयित रित्या आढळून येताच आरपीएफ चे जवान समाधान गवई यांनी त्यांना चौकशी केली असता हडबडलेल्या युवकास बघून गवई यांनी याची माहिती प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना दिली, तेलंग यांनी स्टेशनवर जाऊन दोघांना कार्यालयात जाऊन चौकशी केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ करत असलेल्या युवकास खाक्या दाखवताच त्याने त्या मुलीचे मुंबई जोगेश्वरी येथून अपहरण केल्याचे सांगितले मुलीने दिलेल्या तिच्या आईच्या मोबाईल नंबर केला असता ओशिवारा पोलीस ठाण्याचे एपीआय विकास कदम यांनी त्या चिमुकली चे अपहरण बाबत गुन्हा क्र 1267/2024 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता नुसार दाखल असल्याचे सांगितले तेलंग यांनी विडिओ कॉल वर त्या चिमुकली चे आई सोबत बोलणे करून दिले असता मुलीला बघून आईने एकच हंबरडा फोडला, त्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्याची एक टीम लगेच मुंबई हुन शेगाव ला रवाना करण्यात आली शेगाव ला आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या चिमुकली ला व अपहरण कर्ता विकास गुप्ता याला ओशिवारा पोलिसांच्या टीमचे योगेश नागरे व दीपाली गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले, शेगाव आरपीएफ निरीक्षक शांताराम हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय अजय राजपूत ,ए एस आय प्रवीण भरणे प्रधान आरक्षक रंजन तेलंग,आरक्षक समाधान गवई,आरक्षक बोतुले  यांनी ही कार्यवाही केली ।

यापूर्वी ही शेगाव आरपीएफ च्या टीम ने 03 अपहरणाच्या गुन्ह्यातून चिमुकल्यांची सुटका केली आहे हे विशेष,, यामुळे पुन्हा या दमदार  कार्यवाही ने आरपीएफ विभाग एकदा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे

Post a Comment

أحدث أقدم