खामगाव विधानसभेत "हम दो शेर"!
फक्त फुंडकर सानंदा टक्करीची चर्चा!
खामगाव नितेश मानकर : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी चुरशी ही वाढली आहे. खामगाव विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत असून या ठिकाणी माजी आमदार दिलीप सानंदा व विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे "क्यू पडे हो चक्कर में कोई नही है टक्कर" मे असे बोलल्या जातात.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत जाईल तसतशी काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरुन कुरबुरी कानी पडतील असे मतदार संघातील राजकीय जाणकारांनी गृहीत धरले होते. परंतु सध्याची एकूणच परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये दिलीपकुमार सानंदाच काँग्रेसचे उमेदवार राहणार असल्याच्या चर्चांनी क्यो पडे हो चक्क्र में, कोई नही है टक्कर में असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आपल्या देशात क्रिकेट आणि राजकारण याची मर्यादे पलीकडे क्रेझ आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही क्षेत्रात त्यातील पैलु हे एका ठराविक कालावधीनंतर उलगडत जातात. किक्रेटमध्ये एखाद्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत जसे दोन गट असतात व प्रथमदर्शनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक संघ स्वतःला प्रबळ दावेदार सांगतो. परंतु हळूहळू साखळी सामने संपतात आणि मग चित्र स्पष्ट होवनू एखादा अपवाद वगळता किक्रेट विश्वात दबदबा असणारेच संघ उपांत्य किंवा अंतिम सामना गाठतात.
हीच स्थिती सध्या खामगावातील राजकारणात असून, चार महिन्याआधी काँग्रेसचे तिकिट मिळवण्यासाठी ईच्छूक उमेदवारांना कोणकोणते दिव्य पार करुन जावे लागेल याचा अंदाज बांधणेही कठीण होते. परंतु सध्याच्या वातावरणावरुन शर्यतीमधील इतर दावेदार मागे सारले गेले असून, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असे चित्र त्यांच्या हालचालीवरुन दिसते. तसा शब्द देखील त्यांना मिळालेला असू शकतो. त्यामुळे आता सानंदा,
फुंडकर लढतीच्या घोषणेची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची शहरात चर्चा आहे.
दहावर्षाआधी पंधरावर्षाच्या आमदारकीची प्रदीर्घ कारकिर्द पुर्ण करुन विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेले दिलीपकुमार सानंदा व अवघ्या पंंचवीशीत राजकीय आखाड्यात उतरलेले आकाश फुंडकर यांच्यात जिल्ह्यातील हायहोल्टेज लढत रंगली होती. त्यानंतर मात्र, 2019 मध्ये राजकीय पक्ष तेच परंतु काँग्रेसचा उमेदवार बदलल्याने अखेरच्या क्षणी खामगाव मतदार संघातील चित्र बदलले होते. परंतु, यंदा सानंदा लोकसभेच्या निकालानंतरच कामाला लागेल असून, गत चार-पाच दिवसापासून सानंदांच्या देहबोलीवरुन तेच येथील काँग्रेसचे उमेदवार राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यंदाच्या निवडणुकीत मात्र, दिलीपकुमार सानंदांसाठी आव्हाने तगडी राहणार असून, लोकसभेत राज्यात काँग्रेसला मिळालेले यश हे त्यांच्यासाठी आशादायी चित्र आहे. हेच दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असले तर दोघांनाही राजकारणील डावपेज, कुरघोड्या, मुत्सद्देगिरी आता नवीन नाहीत. त्यामुळे स्वतःच्या विजयासाठी दोघेही आपल्या शक्य त्या राजकीय आयुधांचा वापर करतील आणि दोघांच्या लढतीत कोणाच्याच विजयाची खात्री देणे सध्याच्या घडीला तरी अशक्य असून, राजकारणातील या दोन्ही बलाढ्य उमेवारांसाठी शेवटी ऐवढेच म्हणावे लागेल की,
विरासत से तय नही होते
किस्मत के फैसले
ये तो उडान बताएगी
आसमान किसका हैं...
إرسال تعليق