गौतम गवई आहेत खामगाव विधानसभा मतदार संघांचे काँग्रेस पक्षाचे दावेदार

 लोखंडा येथे  गौतम गवई यांचे उत्स्फूर्त स्वागत...

खामगाव - आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीचा भाग म्हणून आज गौतम गवई  यांनी त्यांचे मूळ गाव असलेले ग्राम लोखंडा येथे सदिच्छा भेट दिली .गौतम गवई  काँग्रेस पक्षाचे  अनुसूचित जाती विभाग प्रदेश सरचिटणीस आहेत. लोखंडा येथे जाऊन सर्व जुने जाणते कार्यकर्ते, ओबीसी वर्गातील जेष्ठ तसेच युवक व महिला या सर्वांच्या भेटी गाठी घेत मुक्त सवांद साधला. सर्व युवक एकत्र येत सर्वांनी  संपूर्ण गावातून  फेरी काढत गावातील वयोवृद्ध व्यक्ती तसेच सर्व जातीतील लोकांशी बातचीत केली. त्यानंतर   अंबादास वानखडे माजी  उपसभापती प स खामगाव यांनी  गावाकऱ्यांसमोर गौतम गवई यांच्या सामाजिक कार्याचा संपूर्ण आलेखच मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मुलमंत्र दिला " जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा कि मला शासनकर्ती जमात व्हायचं आहे " पण आपण  एक जातीय राजकारण करत असल्यामुळे शासनकर्ती जमात न बनता फक्त आणि फक्त  पिढ्यानं पिढ्या मतदान करत आहोत. सत्ता नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद मधील लहान लहान योजणांचा लाभ मिळविण्यासाठी आदळ आपट करावी लागते. मोर्चे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. हॉस्पिटल मध्ये गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही. एकूणच व्यवस्था आपल्या कशी विरोधात आहे यावर  सविस्तर मांडणी अंबादास वानखडे यांनी केली. गावातील तरुणांनी ही यावेळी आपली मनोगत व्यक्त करतांना यावेळी जर काँग्रेस पक्षाने गौतम गवई विधानसभा निवडणुकीत संधी दिली तर आम्ही काहीही न बघता गावोगावी फिरू, लोकांशी चर्चा करू, बहुजन समाजातही जाऊ आणि गौतम गवई यांचेविषयी आवाहन करू अशा भावना व्यक्त करत लोखंडा गावातील युवकांनी  खामगाव विधानसभा मतदार संघातील संपूर्ण  कार्यकर्ते व युवकांनाही आवाहन केले कि अभ्यासू व सामाजिक तळमळ असलेलं एकमेव व्यक्तीमत्व गौतम गवई यांच्या पाठीशी उभे राहावे.



त्यानंतर गौतम गवई यांनी आपल्या भावना मांडताना लोखंडा गावातील आपल्या आठवणीना उजाळा दिला. आंबेडकरी चळवळ, वर्तमान स्थिती यावर भाष्य करतांना आपल्याला ओबीसी व मुस्लिम समूहाची साथ मिळाल्याशिवाय राजकारणात आपल्या हाती काहीही लागणार नाही, असे सांगताना आपली एवढी शक्ती असतांना वाया का घालवता असा सवाल केला. सत्ता जर असेल तरच गोरगरीब व समाजातील सर्व उपेक्षित - वंचित - पीडित घेतकांना कसा न्याय देता येतो याबद्दल अनेक गौतम गवई यांनी दिली उदाहरणं दिली. म्हणून आपण सत्ते सोबत गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले. गावातून फिरताना ओबीसी समूहातील असंख्य गावाकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे समर्थक युवकांसह गावकऱ्यांमध्ये चैतन्य.काँग्रेस पक्षाने जर विधानसभेची उमेदवारी दिली तर खंबीरपणे साथ देऊ गावाकऱ्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी यशवंतराव हिवराळे, पुंजाजी हिवराळे, रामेश्वर हिवराळे, अरविंद हिवराळे, मिलिंद हिवराळे, रमेश हिवराळे, सिद्धार्थ हिवराळे, दिपक हिवराळे, शाहीर हिवराळे, वामन उर्फ राजू हिवराळे, शांताराम हिवराळे, भगवान हिवराळे, सुनील गव्हादे, अनिल गव्हादे, योगेंद्र हिवराळे वीरेंद्र हिवराळे , मिलिंद हिवराळे, नितेश हिवराळे, नवल हिवराळे, नाजूक हिवराळे, बारकू सुरवाडे,उईके,मधुकर हिवराळे सह असंख्य नागरिक उपस्थित होते





Post a Comment

أحدث أقدم