विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; छाननीअंती 22 नामनिर्देशनपत्र पात्र तर 04 अपात्र

 खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) दि.30:भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सातही विधानसभा मतदारसंघामध्ये 26 उमेदवारांनी  नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यांची छाननी आज करण्यात आली. त्यानुसार 22 अर्ज पात्र तर 04 नामनिर्देशने अपात्र ठरविण्यात आली आहेत. 

26- खामगाव विधानसभा मतदारसंघात आज छाननी करण्यात आली.  खामगांव येथे 22 उमेदवारांचे नामनिर्देशन पात्र ठरले. खामगांव  चार नामनिर्देशन अर्ज एकूण 04 अर्ज अपात्र ठरविण्यात आली आहेत. 

  अशी आहेत खामगांव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव :आकाश पांडुरंग फुडंकर(भारतीय जनता पार्टी), धिरज धम्मपाल इंगळे सौ  आश्विनी विजय वाघमारे (बहुजन समाज पार्टी), राणा दिलीपकुमार गोकुळ सानंदा (इंडियन नॅशनल काँग्रेस),‍शिवशंकर पुरुषोत्तम लगर(महाराष्ट नवनिर्माण सेना), देवराव भाऊराव हिवराळे(वंचीत बहुजन आघाडी), पवन केशव जैन वशीमकर (समता पार्टी), भिमराव हरीषचंद्र गवई (रिपब्लीक सेना), मोहमद आरीफ अब्दुल लतीफ(ऑल इंडीया मजलीस इ-इनकलाब-इ-मिलात), मो.हसन इनामदार (मायनॅरिटिज डेमोक्रेटीक पार्टी), शे.रशीद शे कालु (इंडीयन नॅशनल  लीग). अपक्ष उमेदवार : अमोल अशोक अंधारे, उध्दव ओंकार आटोळे, ‍किरण रामचंद्र मोरे, निखिल मोहनदास थडे, प्रकाश वासुदेव लोखंडे, मोहम्मद फारुख अब्दुल वाहब, रमेश केशवराव खिरडकर, ॲड. रविंद्र ज्ञानदेव भोजने, सिध्दोधन भारत साळवे, शेख फारुख शेख बिस्मील्ला, शाम बन्सीलाल शर्मा.

सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. बुधवार दि.  20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.


Post a Comment

أحدث أقدم