डेंग्यु सदृश्य आजाराच्या विळख्यात खामगावकर ? दररोज होत आहेत खामगावतील रुग्णांचे "प्लेटलेट" कमी
प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात?
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ः शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यु सारख्या जीवघेण्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्युच्या साथीमुळे(?) दररोज खामगाव सामान्य रुग्णालयात रुग्णांची हजेरी वाढत आहे. अशी भयावह स्थिती आहे. मात्र प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक नसून आरोग्य प्रशासन तर कोमात गेल्या जोगे आहे. शहरातील सामान्य रूग्णालयासह खाजगी दवाखाने रूग्णांनी हाऊसफुल झाले असून खाजगी उपचार घेताना रूग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
खामगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मानवी शरिरास बाधक वातावरण निर्माण झाले. सोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यु, टायफेड, मलेरिया अशा जिवघेण्या आजाराने डोके वर काढले आहे. शहरातील एकही असा वार्ड नसेल जेथे चार - पाच घरे सोडली तर डेंग्युचा रूग्ण सापडणार नाही अशी परिस्थित आहे. मात्र यावर प्रतिबंध लावणे नगर पालिका प्रशासनासह आरोग्य खात्याची जबाबदारी असताना त्यांच्याकदूनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शहरात नगर पाकिलेकडून गांजर गवत निमर्मुलन, नाल्यांचे निर्जंतुकीकरण, फॉगिंग मशिन फिरविणे, आवश्यक त्या ठिकाणी सच्छता अभियान राबविणे, गप्पी मासे साळने, उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी कामे होणे अतिआवश्यक असताना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. दरम्यान प्रशासनाचा निष्काळजीपणा आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची आता गरज आहे.
डेंग्युचा रूग्णाला सहन करावा लागतोय मोठा भुर्दंड
शहरात डेंग्यु सारख्या जिवघेण्या आजाराची साथ सुरू असून सर्व दवाखाने हॉऊसफुल झाले अशी परिस्थिती आहे. सामान्य रूग्णालया उपचार निशुल्क होत असले तरी येथील मॅनपावर व सुविधा पाहता रूग्ण खाजगी दवाखान्याची वाट धरतात. दरम्यान रूग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांकडून रक्त, लघवी आदी टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे दरही मोठे आहेत, त्यामुळे सद्या पॅथालॉजीवाल्याचे चांगलेच फावले आहे. तसेच दोन टाईम इंजेक्शन, सलाईनचा डोस दावा लागतो. तर डेंग्यु झालेला रूग्ण रिकव्हर करण्याठी तब्बल १२ ते १५ हजार रूपया पर्यंतच आर्थिक खर्च येत असल्याची माहिती एका खाजगी डॉक्टरांनी बोलताना दिली आहे. यामुळे हातावर काम असणाऱ्याची माट एकप्रकारे यातूनच थट्टाच चालविल्याचे दिसून येत आहे.
रेखा प्लॉट बनतोय हॉटस्पॉट!
येथील सती फैल भागात मोडणाऱ्या रेखा प्लॉट भागात तर अनेक डेंग्युचे रूग्ण सापडले आहेत. या परिसरातून नाला वाहत असून मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. दररोज नवनवीन रूग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून रेखा प्लॉट भाग डेंग्युचा हॉटस्पॉट बनतो काय अशी भिती व्यक्त केल्या जात आहे.
إرسال تعليق