फरार आरोपी हैदर खान अन्वर खान रा. हरी फैल खामगांव यास अटक
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- पो.स्टे. खामगांव शहर येथे अपराध क्रमांक 392/2024 क. 296, 126 (2), 352, 351 (2), 3/5 सह कलम 3(1) (r) (s), 3 (2) (va) अ.जा.ज.प्र.का. चा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामधील आरोपी नामे हैदर खान अन्वर खान रा. हरी फैल खामगांव हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. तसेच त्याचेवर यापुर्वी पो.स्टे. रामतिर्थ जि. नांदेड अपराध क्र. 22/2014 क. 20 (ब) N.D.P.S. अॅक्ट, पो.स्टे. खामगांव शहर अपराध क्रमांक 70/2014 क. 143, 144, 145, 147, 148, 341, 336, 324 भा.द.वि. सह क. 3(1), (10) अत्याचार प्रतिबंधक कायदा असे गुन्हे दाखल होते. सदर गुन्हे केल्यापासुन नमुद आरोपी हैदर खान हा फरार होता.
त्याचा तांत्रिक साहाय्याने तसेच गोपनियरित्या माहिती काढुन त्याचा शोध घेतला असता नमुद आरोपी हा दि. 06.09.2024 रोजी घरी आल्याची माहिती मिळाली होती. त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद ठाकरे साहेब यांचे आदेशाने पो. स्टॉफ शोधण्यासाठी गेला असता त्यास पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो मागील दरवाजातुन पळत सुटला. परंतु त्याचा हरीफैल मधील गल्लीबोळामध्ये पाठलाग करुन पोलीसांनी पकडुन अटक केली आहे.
إرسال تعليق