लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे कार कचरा बॅगचे वितरण



खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:-लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या पर्यावरणपूरक कार कचरा बॅगचे वितरण २५ सप्टेंबर रोजी रिजन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. सुमारे ६० ते ८० बॅगचे वाटप करण्यात आले. असा उपक्रम लॉयन्स क्लब संस्कृती खामगांवच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतो. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजन चेअरपर्सन सुरज मधुसूदन अग्रवाल, झोन चेअरपर्सन उज्वल गोयनका, क्लब पीआरओ लॉ. राजकुमार गोयनका, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार, लॉ. आशिष मोदी, लॉ.सी.एम. जाधव, लॉ. गोविंद चुडीवाले, लॉ. अभय अग्रवाल, लॉ. अजय एम. अग्रवाल, लॉ. सिध्देश्वर दाने, लॉ. संदीप पंडा, लॉ. सुशिल मंत्री, लॉ. आकाश अग्रवाल उपस्थित होते. या प्रकल्पाचे प्रबंधक लॉ. नरेश चोपडा, लॉ. संजय उमरकर, लॉ. विरेंद्र शहा होते. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.



Post a Comment

أحدث أقدم