क्रीडा दिना निमित्त खो - खो सपर्धा

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- क्रीडा व युवक सेवा संचालनालाय पुणे, जिल्हा क्रीडापरिषद बुलढाणा व तालुका समिती खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय  क्रीडा दिना निमित्त  शालेय खो-खो च्या क्रीडास्पर्धा जि वी मेहता विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या. या खोखो. खेळाचे उदघाटन खामगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव महादेवराव भोजने यांच्या उपस्थितीत तर जि वी मेहता विद्यालयाचे प्राचार्य सुनिल जोशी तसेच तालुका संयोजक अनिल मुलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. झाले. 

२९ ऑगस्ट. राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त  मेजर ध्यानचंद  यांच्या जयंती निमित्त  लॉनटेनिस स्पर्धे मध्ये प्रथम आणि द्वितीय खेळाडूंना मान्यवाराच्या हस्ते मेडल देण्यात आले. तसेच खामगाव तालुक्यातील क्रीडाशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.  या वेळी प्रास्ताविक संयोजक अनिल मुलांडे यांनी केले. तर संचलन रवींद्र कापसे यांनी केले. आभार. उबाळे सर यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील क्रीडाशिक्षक. पालक विदयार्थी उपस्थित होते.






Post a Comment

أحدث أقدم