विनयभंग प्रकरणातील आरोपीस ५ वर्षाची शिक्षा व रू. ५० हजार रुपये दंड
दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश
हिंगोली जनोपचार न्यूज नेटवर्क :- शेतात चवळीच्या शेंगा तुडीत असताना तिचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणात सबळ पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एन माने गाडेकर यांनी आरोपीला पाच वर्षाची शिक्षा व 50 हजार रुपये दंड ठोठावला.तसेच दंडातील 30 हजार रुपये पीडीतला देण्याचे आदेश दिले.
याबाबत पार्श्वभूमी अशी की , केसमधील पिडीता हि दि.१५.०३.२०१७ रोजी दुपारी ०३.३० वा. सुमारास जामगव्हाण ता. कळमनुरी येथील शेतात एकटी चवळीच्या शेंगा तोडीत असतांना अरोपी शेख महेमुद पि.शेख फरीद रा. जामगव्हाण ता. कळमनुरी जि. हिंगोली. हा तिचे जवळ गेला व म्हणाला की, मी या पुर्वी तुझ्या शेतात आलो असता माझा मोबाईल हरवला आहे असा म्हणुन तिच्या मोबाईलवरून स्वताच्या मोबाईलवर कॉल केला व शेतात फिरत असताना शेताच्या कडेला थांबले असताना अरोपी तेथे आला व वाईट उद्देशाने पाठीमागुन येउन पिडीतेचा विनयभंग केला व कोणाला सांगीतले तर जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आ.बाळापुर पो.स्टे. येथे गु.रं.नं ५३/२०१७ कलम ३५४,५०६ भादवी सह कलम ३(१) (१आर) एस) (डब्लु) अजाज प्र. कायदा अन्वये अरोपी विरूध्द गुन्हा नोदवुन गुन्हयाचा तपास एस.वी काशिद उपविभागीय पोलीस अधिकारी व डॉ. एस. बी. भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केला. प्रसतुत प्रकरणात विद्यमान न्यायालयात विषेश खटला क.०१/२०१८. देण्यात आला. सदर प्रकरण हे जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.एस.एन. माने-गाडेकर यांचे समोर ठेवण्यात आला. या प्रकरणात सहा. सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी एकुण ०३ साक्षीदार तपासले व अंतिम युक्तीवाद केला. यामध्ये न्यायालयात पिडीतेची साक्ष महत्वपुर्ण ठरली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.एस.एन. माने-गाडेकर हिंगोली यांनी आज दि.०९.०९.२०२४ रोजी विषेशखटला क ०१/२०१८ सरकार वि.शेख महेमुद या प्रकरणात अरोपी शेख महेमुद शेख फरीद यास कलम ३५४ भादवी अन्वये ५ वर्षे शिक्षा २५.००० रू. दंड दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावास व सहकलम ३(१) (आर) (डब्लु) अजाज प्र. कायदा अन्वये ५ वर्षे शिक्षा २५,००० रू. दंड दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावास अन्वये दोषी ठरवुन दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगावण्याचे आदेशीत केले आहे तसेच रक्कम ५०.००० रूपये दंडाच्या रक्कमे पैकी ३०.००० रूपये हे पिडीतेस देण्याचे आदेश केले.
उपरोक्त प्रकरणात सरकार पक्षातर्फे श्री एन. एस. मुटकुळे सरकारी वकील यांनी बाजु मांडली व त्यांना श्री.एस.डी.कुटे व श्रीमती सविता एस. देशमुख सरकारी वकील यांनी सहकार्य केले. व तसेच मपोहे/सुनिता जे धनवे कोर्ट पैरवी पो.स्टे. आखाडा बाळापुर यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق