फसवीणारे 3 आरोपीना अटक :  20 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

शिवाजी नगर पोलिसांची कारवाही

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- फसवणूक करून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी मोठ्या शिफारतीने अटक करून त्यांच्याकडून वीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

हकीकत अश्या प्रकारे आहे की, नमुद घ ता वेळो व ठिकाणी यातील टेंकर क्रमांक G) 12 AU 7977 चा चालक सब्बु छगन धर्वे रा. मनवर जि. धार मध्यप्रदेश यांने लिलोत्तम इंडस्ट्रीज तलाव रोड, खामगांव येथुन सदर टैंकर मध्ये एकूण 32 टन 650 किलो सरकी वॉश तेल एकुण 27,10,000/- किंमतीचे भरुन घेवून ठरवून दिलेल्या पत्यावर न पोहचविता मध्येच कोठेतरी फरार झाला आहे अश्या फिर्यादी नामे नमन राकेश सिंगल रा. आरएच कॉलनी हनुमान गढ़ राजस्थान यांनी वि. कोर्टात सादर केलेल्या दस्ताऐवजावरुन वि. कोर्टाने सदर प्रकरणी गुन्हा दाखल करणेबाबत आदेश दिल्याने व सदरचा आदेश दिनांक 30/03/2024 रोजी पो.स्टे. ला प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला आहे.


नमुद गुन्हयामधील आरोपी नामे । महेंद्रकुमार हरगोवीदभाई मकावाना वय 43 वर्ष रा.रवी नगर गुजरात 2. कल्यान ताताराव सौरभ वय 28 वर्ष रा. आदीपुर कच्छ गुजरात यांना 3. संजय हजारीलाल मावर वय 36 वर्ष रा. कच्छ गुजरात यांना पोस्टे रावणवाडी गोदीया जील्हा गोंदीया यांनी वर नमूद आरोपी यांना अटक केली असल्याबाबत माहीती मीळताच आम्ही नमुद आरोपी यांना वि.न्यायालयाकडुन प्रोड्स वांरट प्राप्त करुन नमुद आरोपी यांना ताब्यात घेवुन पोस्टे शिवाजी नगर खामगाव अप क्र.97/2024 कलम 420,407 भादवि मध्ये अटक करुन नमुद आरोपीतांना वि.न्यायालयात हजर केले असता वि.न्यायालयाने नमुद आरोपी यांचा दिनांक 09/09/2024 पावेतो पोलीस कस्टडी मंजूर केल्याने नमुद आरोपी यांना गुन्हयाचे संबंधाने विचारपुस केली असता आरोपी क्रमांक 01. याने गुन्हयाची कबुली दिली. मा. पोलीस अधिक्षक सा बुलडाणा यांचे परवानगीने व मा.पोनी सा यांचे आदेशाने पोउपनि संजय उदासी. पोहेकॉ किरण राऊत बन 861. पोना अरवीद बडगे बन 1983, पोकों दिपक राठोड बन 523. पोको प्रफुल टेकाळे बन 878, यांचे तपास पथक नेमुण तपास पथक आरोपी नामे महेंद्रकुमार हरगोवीदभाई मकावाना वय 43 वर्ष रा. रवी नगर गुजरात याचे सह गुंन्हयामधील मुद्देमाल हस्तगत करणे कामी रवाना केले. नमुद पथक हे गुजरात येथे जावुन त्यांनी गुजरात येथून एकुन 20,000,00/- (विसलाख रुपये) चा मुद्देमालहस्त केला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. विश्व पानसरे साहेब बुलडाणा, अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब खामगांव, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. विनोद ठाकरे साहेब, खामगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. पितांबर आधव यांचे नेतृत्वात पोउपनि संजय उदासी, पोहेकों किरण राऊत बन 861, पोना अरवीद बडगे वन 1983 नापीकों राजू कोल्हे बन 2034, पोको दिपक राठोड बन 523, पोको प्रफुल टेकाळे बन 878, पोकों जीतेश हिवाळे बन 2364 यांनी केली आहे

Post a Comment

أحدث أقدم