पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेचे भाजपच्या वतीने भव्य स्वागत
आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले अभिवादन
*खामगांव: जनोपचार न्यूज नेटवर्क:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदेश यात्रेचे आज भाजपाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे संदेश घेऊन यात्रा गावोगावी निघत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या संदेश यात्रेचे आगमन काल सायंकाळी खामगाव मतदारसंघात झाले. रात्री मुक्कामी असलेल्या कोंटी येथे जावून आ अँड आकाश फुंडकर यांनी या संदेश यात्रेचे स्वागत करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच या यात्रेसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी धनगर महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे, माझे समाज कल्याण सभापती डॉ गोपाल गव्हाळे, डॉ एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष विलास काळे, शांताराम बोधे, नंतर महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाचपोर, भाजपा प्रदेश सदस्य डॉ पंकज भवटे, कोंटी सरपंच संजय ठोंबरे, रथयात्रा प्रमुख रवींद्र गुरव, हिवरखेड सरपंच संदीप हटकर, अंतरा सरपंच किशोर वरखेडे, वरना माजी सरपंच संतोष वाघ, सुदाम इंगळे, गजानन कळस्कर, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
तर ही संदेश यात्रा आज खामगाव शहरात दाखल झाली. स्थानिक शहर पोलीस स्टेशनच्या समोर या संदेश यात्रेचे भव्य स्वागत भारतीय जनता पार्टी खामगाव च्या वतीने करण्यात आले. सर्वप्रथम आ अँड आकाश फुंडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ अँड आकाश फुंडकर यांच्यासह माजी आमदार नानाभाऊ कोकरे, भाजपा, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भाजपा खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष विलास काळे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव राम मिश्रा, खामगाव विधानसभा युवा मोर्चा संयोजक पवन गरड, नगरसेवक राकेश राणा, नरेंद्र रोहनकार , शांताराम बोधे, संजय ठोंबरे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख ,गुलजन्माशहा , बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका सौ जानवीताई कुलकर्णी खामगाव अर्बन बँकेच्या संचालिका मनिषाताई माटे, महिला आघाडी शहराध्यक्ष शिवानीताई कुलकर्णी, माजी नगरसेविका भाग्यश्रीताई मानकर, सौ श्रद्धाताई धोरण ,सौ भक्ती वाणी ,वैभवदादा डवरे ,कृष्णा ठाकूर ,
प्रसाद यदलाबादक,र देवा गावंडे, आकाश बडासे, सोनू निभेवानी, विजय महाले, विजय आनंदे, गोपाल गोंड ,प्रवीण ढोरे ,श्रीबाप्पू देशमुख ,ओम काळे, किशोर लोखंडे ,भागवत वनारे ,अनिल मेतकर, अतुल माहुरकर संतोष येवले कल्पेश बजाज, पंकज सरकटे ,अक्षय मस्के ,आकाश शिंदे, मिथिलेश पांडे ,पवन राठोड, मयूर घाडगे, पवन ठाकूर, निकुंज मंदानी, योगेश गई ,बंटी खंडेलवाल ,संजय भागदेवानी ,संतोष गुरव, विकी हट्टेल ,रोहित माळवंदे, महेश खानंदे, शशांक वक्ते, अक्षय माहुरकर, राजेश शर्मा, अभिलाष मुऱ्हे, संतोष गुरव ,बाळू बाणाइत आधी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आ अँड आकाश फुंडकर यांचेसह या संदेश यात्रेत सहभागी झाले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जयजयकार केला.
إرسال تعليق