जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भाजप युवा मोर्चा सती फैल शाखेचे उद्घाटन
खामगाव :रत्नाताई दिक्कार:कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सती फईल भागात भाजपा युवा मोर्चाच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागर दादा फुंडकर यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
ह्यावेळी नगरसेवक राकेश राणा, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव रामजी मिश्रा, भाजपा विद्यार्थी आघाडी सरचिटणीस आशिष सुरेखा, भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पवनजी ठाकूर, भाजप विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राज पाटील, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतीक मुंढे पाटील, शाखाध्यक्ष वैभव रेठेकर, शाखाउध्यक्ष अनुज यादव, शाखा सरचिटणीस अभिषेक बोराडे, शाखा सचिव हर्ष खिरडकर, बुथ प्रमुख सौरभ देशमुख, सोनुसिंग मेहरा आदी मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق