चला सहभागी होऊ
पालखी मार्ग स्वच्छ ठेऊ..
मुक्तांगण राबविणार शेगाव खामगाव पालखी मार्गावर स्वच्छता अभियान
.jpg) |
▪️पालखी मार्ग स्वच्छ ठेवा,▪️कचरा कुंडीचा वापर करा.▪️आवश्यक तेवढेच घ्या.▪️इतरत्र अन्न व प्रसाद फेकू नका.▪️लहान मुलांना व प्रौढ व्यक्ती ना सांभाळा.▪️आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.▪️इतरांना पुढे जाण्यास मार्ग मोकळा ठेवा▪️रस्त्याच्या मधोमध थांबू नका.▪️स्टॉल धारकांनी आपल्या स्टॉलची स्वच्छता ठेवा.▪️स्टॉल धारकांनी जास्तीत जास्त▪️कचरा कुंड्यांची व्यवस्था करा.▪️मुक्तांगणला सहकार्य करा सहभागी व्हा.
|
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ( वर्षे १० वे ) मुक्तांगण परिवार पालखी मार्ग स्वच्छता अभियान राबवणार आहे. दि.१०.०८.२०२४ ला संत श्री गजानन महाराज पालखीचा मुक्काम खामगाव येथे होणार असून दुस-या दिवशी ( दि. ११.८.२४ ) सकाळी पालखीचे शेगाव साठी प्रस्थान होणार आहे. यासोबत लाखो हजारो भाविक पालखीसोबत पायदळ पायी वारी करतात. खामगाव ते शेगाव पालखी मार्गात अनेक दानशूर व्यक्ती,संस्था,खाजगी व्यावसायिक हे चहा,नास्ता, फराळ, जेवण इत्यादी चे वाटप करतात. बरेचदा वाटप केलेले पदार्थ खालल्यानंतर शिल्लक राहतात. ते लोक इतरत्र फेकतात. ज्यामुळे पालखी मार्गात अनेक ठिकाणी अस्वच्छता येते. हे अन्न पायाखाली येऊ नये. कुणाचा पाय घसरुन अपघात होऊ नये, पालखी व वारकऱ्यांसाठी स्वच्छ रस्ता असावा म्हणून मुक्तांगण दरवर्षी पालखी अगोदर व नंतर स्वच्छता अभियान राबवते. यासाठी मुक्तांगण चे स्वच्छता दूत पहाटे ४.०० ते पालखी मार्ग स्वच्छ होईपर्यंत मनोभावे आपली स्वच्छसेवा देतात. पालखी मार्गात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मुक्तांगण तर्फे असे आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कचरा रस्त्यावर टाकू नये.
सहभाग नोंदवण्यासाठी संपर्क
१) नितीन भारसाकडे -9423721280
२) कैलास कुटे - 9623358020
३) श्याम पाटील -9890686277
४) गणेश पिंपळकर - 9011265001
५) किशोर बुजाडे - 8459965305
إرسال تعليق