राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या  नियुक्त्या झाल्या जाहीर 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  ८ ऑगस्ट रोजी खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाचे संघटन सचिव मा रावसाहेब पाटील यांच्या  हस्ते काहींना विविध  नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या नियुक्त जाहीर करण्यात आल्या तसेच भविष्यात आपल्या माध्यमातून पक्षाचे चांगले कार्य व्हावे ह्या सदिच्छा दिल्या एकंदरीत काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट चे संघटनात्मक पक्ष बांधणीचे काम मोठ्या जोमाने सुरू असल्याचे हे दिसून येत आहे यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक संभाजीराव टाले जिल्हा ओबीसी निरीक्षक संजय बगाडे तालुका ओबीसी अध्यक्ष संतोष पेसोडे युवक शहराध्यक्ष रुद्राक्ष कोकणे हे ओबीसी शहराध्यक्ष वेदांशू पतंगे उपस्थित होते यावेळी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी उमेश बाभुळकर यांची नियुक्ती करण्यात आली तर पक्षांच्या सेवा दल विजय टिकार विद्यार्थी विभाग तालुका अध्यक्ष पवन गाढवे ओबीसी विभाग उपाध्यक्ष मोहन खोटरे तसेच यांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थी विभाग नायदेवीची  शाखा गठीत करण्यात आली आहे यावेळी सहदेव दनके देविदास अंभोरे महेश बाबुळकर सुधीर ढगे सुरज बाभुळकर विठ्ठल भालेराव आदिनाथ बाभुळकर राम बाभुळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती. 


Post a Comment

أحدث أقدم