काळ बनुन आलेल्या टिप्परने अखेर चिमुकल्याल हेरलेच: दुर्दैवी घटनेत शौर्य चा मृत्यू

खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क:- काळ म्हणन आलेल्याभ टिप्परने अखेर पंधरा वर्षीय शौर्य ला हेरलेच . खामगाव शेगाव रोडवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत शौर्य जितेंद्र देशमुख या 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू तर त्याच्या दुचाकी वर असलेला दुसरा मुलगा जखमी झाला आहे.  ही घटना खामगाव शेगाव मार्गावरील श्रीनिवास पेट्रोल पंपा समोर २० ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता दरम्यान घडली.

 खामगाव शहरातील रहिवासी धनंजय विश्वजीत चव्हाण (15) रा. हंसराज नगर व शौर्य जितेंद्र  देशमुख   (15) रा. वाडी हे दोघे दुचाकी क्र. एम एच 28 ए क्यू 68 71  वरून श्रीनिवास पेट्रोल पंपा समोरून जात असताना शेगाव कडून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्पर क्र. एम एच 28 बीबी 7760  ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघे अल्पवयीन युवक जखमी झाले असून त्यांना तातडीने नागरिकांनी उपचारासाठी येथील  सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे दोघांवर प्रथम उपचार करण्यात आले. परंतु शौर्य जितेंद्र देशमुख याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर करीत असताना त्याचा मृत्यू झाला.  अपघातानंतर टिप्पर चालकाने पोबारा केला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून टिप्पर पोलीस स्टेशनला लावले आहे. वृत्तलेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.




Post a Comment

أحدث أقدم