हिंगोली न्यायालयात स्वतंत्रता दिवस साजरा
हिंगोली जनोपचार न्यूज नेटवर्क :- देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण भारतात साजरा केला गेला. तिरंगा फडकवून हा उत्सव सर्वत्र अगदी आनंदाने साजरा करण्यात आला. स्थानिक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आवारातही तिरंगा फडकवून राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ सरोज माने गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाचे अध्यक्ष तसेच विधीतज्ञ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
बातमी संदर्भातील व्हिडिओ👇👇👇👇👇
إرسال تعليق