बेभान वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी बुलडाणा पोलीस नंबर१ !
वाळू तस्कर मुन्ना वाघ तडीपार
एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ, वय ३५ वर्ष, रा. डिग्रस ता. देउळगांवराजा जि. बुलढाणा याचेवर यापुर्वी अवैधरीत्या वाळु चोरी करुन वाहतुक करणे, शासकीय कर्मचारी यांचेवर हल्ला करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे व इतर असे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा कायदयास काही जुमानत नसल्याने त्यांचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन त्याचे गुन्हेगारी कुत्यांवर आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी त्यांस स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने त्यांस एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.०१.०७.२०२४ रोजी पारीत केला. विदर्भातील पहीली वाळू तस्करांवर केलेली कार्यवाही असुन सदरबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे वाळु माफीयांचे कर्दनकाळ बनलेले आहेत.
![]() |
जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांचे आदेशावरून मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ याचा तात्काळ शोध घेवुन त्यांस आदेश तामील करून त्यांस दिनांक ०२.०७.२०२४ रोजी जिल्हा कारागृह अकोला येथे स्थानबध्द केले. |
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक, सुनील कडासने यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पो.ना. संजय भुजबळ, यांनी तसेच पो.स्टे. अंढेरा येथील सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोकॉ. गोरखनाथ राठोड यांनी परिश्रम घेतले. बुलढाणा जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन वाळू तस्करी करणारे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत वाळु तस्कर आरोपींची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरूध्द एम.पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावित आहे.
إرسال تعليق