नॅशनल हायस्कूल मध्ये विद्यार्थी विज्ञान मेळावा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक श्री अ. खि. नॅशनल हायस्कूल खामगाव येथे तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा पार पडला. या विज्ञान भाषण स्पर्धेमध्ये एकूण दहा स्पर्धकांनी भाग घेतला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी आपले विचार उत्कृष्टपणे व्यक्त केले. या विज्ञान भाषन स्पर्धेमध्ये स्व. कृष्णराव रामजी पाटील विद्यालय बोरी आडगाव ची विद्यार्थिनी कु. तेजश्री गजानन इंगळे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर श्री अ.खि. नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी कु. श्वेता उमेश खंडेराव व जागृती ज्ञानपीठ आंबेटाकळी या विद्यालयाचा विद्यार्थी स्वरूप विठ्ठल उंबरकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला .या कार्यक्रमाला नॅशनल हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ उदापूरकर मॅडम या अध्यक्षा म्हणून लाभल्या तर खामगाव पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री गायकवाड साहेब, नॅशनल हायस्कूलचे उप मुख्याध्यापक श्री दिगंबर सर तसेच बुलढाणा जिल्हा विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री जारे सर व बुलढाणा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री क्षीरसागर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या भाषण स्पर्धेचे मूल्यमापन श्री नारखेडे सर व सौ ठाकरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राठोड सर तर आभार प्रदर्शन सौ पाथ्रीकर मॅडम यांनी केले .विज्ञान भाषण स्पर्धा यशस्वी होण्याकरिता स्थानिक शाळेतील शिक्षक श्री खाचणे सर, सौ तोडकर मॅडम, सौ काजळे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या तालुकास्तरीय भाषण मध्ये साठी खामगाव तालुक्यातील विविध शाळांमधील विज्ञान शिक्षक व शिक्षिका यांनी आपला सहभाग नोंदविला.
إرسال تعليق