मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चा अर्ज मराठीत भरलाय ! घाबरू नका..!! तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे.. फक्त आता पुढे इंग्लिश मध्ये अर्ज भरा !
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो घाबरू नका... तुम्ही मराठीतून अर्ज भरला असेल तर तो ग्राह्य धरल्या जाणार आहे, फक्त यापुढे मात्र इंग्रजीतून अर्ज भरा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले यांनी एका प्रसिद्धी माध्यमातून केले आहे. त्यामुळे आता महिलांची होणारी धावपळ निश्चितच संपुष्टात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत मराठीत भरलेले फॉर्म डिलीट होणार असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात पसरली होती. परंतु असे काही नाही. ज्यांनी आतापर्यंत मराठीतून अर्ज भरले त्यांना निश्चितच लाभ मिळणार आहे. यापुढे मात्र इंग्लिश मध्ये अर्ज करावा, चुका होऊ देऊ नये असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद एंडोले यांनी केल्याचे एका न्यूज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
![]() |
Advt. |
लाडकी बहीण योजनेतील बुलढाणा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 5 लाख आहे. आतापर्यंत 4 लाख पर्यंत अर्ज ऑनलाईन भरून झाले आहेत. अजूनही अर्ज अपलोड करणे सुरू आहे. प्रशासकीय स्तरावर 7 तारखेपर्यंत हे अर्ज अपलोड करायचे आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत मराठी मध्ये ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना लाभ मिळणार नाही असा गोंधळ उडाला आहे. परंतु त्यांनी घाबरून जाऊ नये, आतापर्यंत मराठीत अर्ज भरलेल्या निश्चितच लाभ मिळणार आहे. अशी ही माहिती जिल्हा कार्यक्रमाधिकारी इंडोले यांनी एका न्यूज पोर्टलला दिली आहे.
إرسال تعليق