प्रतीक्षा संपली....

उद्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ:आ फुंडकर यांचे आभार!

खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:-  सन २००८ पासून प्रतीक्षा असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. तब्बल १३ वर्षांपासून रखडलेल्या या योजनेतून आता शनिवारपासून खामगावकरांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर निळकंठ नगरातील पाइपलाइनद्वारे पिण्याचे पाणी सोडण्यात येणार आहे.

शहराची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता खामगाव नगरपालिकेने शिर्ला नेमाने येथून अ वाढीव पाणी पुरवठा योजनेला.. मंजुरी अ दिली. मात्र, विविध परवानगी आणि शह-काटशहाच्या राजकारणामुळे ही प योजना चांगलीच खोळंबली होती

■ वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून खामगावकरांना आता प्रतिव्यक्त्ती १३५ लिटर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत. परिणामी, शहरातील पाणी टंचाई निवारण्यासाठीही मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेतून शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाणार आहे. पाणी पुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांनी पुढील सूचनेपर्यंत या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू नये. 

डॉ. प्रशांत शेळके मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव


,

Post a Comment

أحدث أقدم