"एनसीसी कॅम्प मध्ये श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयाचे सुयश"
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क- स्थानिक श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयातील एनसीसी कॅडेटस चा नुकताच कॅम्प संपन्न झाला यामध्ये श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयातील कु स्नेहा जाधव हीने जेडब्ल्यु गटातुन जिल्हा स्तरावरील स्पर्धैत फायरींग व ड्रिल मध्ये सुवर्ण पदक मिळविले जेडी गटातुन आरडीसी मध्ये सार्थक राठोड याने सुध्दा सुवर्ण पदक मिळविले तसेच गौरव खंडारे याने फायरींग मध्ये सुवर्ण पदक मिळविले.त्याच प्रमाणे कु स्नेहा जाधव,रोहीनी खवले, स्नेहल राजपूत, जान्हवी गायकवाड,साक्षी तायडे,कोमल इंगळे, अस्मिता गायकवाड या कॅडेट्स नी सांस्कृतिक कार्यक्रमात लाक्षणिक सहभाग घेऊन त्यांनी ही सहभाग मानचिन्ह मिळविले.
सदर बक्षीस पात्र कॅसेट्सचा खामगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी जिल्हा संघचालक महादेवराव भोजने,शाळा समिती सदस्य माधवराव कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महादेवराव भोजने यांनी वर्षा च्या सुरवातीलाच विद्यालयाला सुवर्ण पदक मिळवुन दिल्या बद्दल एनसीसी विभागाचे कौतुक असे गौरवोद्गार काढले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.यावेळी प्राचार्य सुनील जोशी, एनसीसी ऑफिसर गणेश घोराळे, जेष्ठ शिक्षक विकास कुळकर्णी, विजय निमकर्डे उपस्थित होते.
إرسال تعليق