अहो आश्चर्य......
चोरट्याने दुचाकी चोरलीच सोबत कुत्र्यालाही नेले चोरून
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहरासह आता लगत असलेल्या ग्रामीण भागही चोरट्यांनी निशाणा बनवला आहे. सोन्या चांदीचे दागिने ,रोख रक्कम व वाहन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता चोरट्याने चक्क दुचाकी सह कुत्र्यालाही(श्वान) पळविल्याची घटना खामगाव तालुक्यात समोर आले आहे. आता या आश्चर्य तितक्याच मजेदार घटनेची चर्चा संपूर्ण खामगाव तालुक्यात होत आहे.शहरालगत असलेल्या घाटपुरी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.
गेल्या महिनाभरात खामगाव शहरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत .त्याचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे . गेल्या आठवड्यात दोन दुचाकीसह दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तरी देखील चोरीचा घटना दिवसाकाठी सुरू आहेत. ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्या वाटल्यामुळे पोलिसांना देखील रात्रीची गस्त वाढविण्याचे गरज निर्माण झाली आहे.
إرسال تعليق