आशा सेविका व अंगणवाडी सेविकांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची कार्यशाळा संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची कार्यशाळा आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी नगर परिषद सभागृहात आज दिनांक 25 जुलै रोजी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती.यामध्ये रविंद्र सूर्यवंशी उपमुख्याधिकारी,प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप सपकाळ, बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बाकल्याण विभाग बुलढाणा, सागर राऊत,बाल संरक्षण अधिकारी जिल्हा महिला व बालकल्याण विभाग बुलढाणा,रंजना धोरण पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी,बुलढाणा, वडोदे मॅडम, पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी बुलढाणा, राजेश झनके अभियान व्यवस्थापक,व अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या.
यामध्ये प्रामुख्याने प्रदीप सपकाळ यांनी एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत नगर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले,तर रंजना धोरण यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सविस्तर माहिती तसेच ॲप डाऊनलोड करून कसा भरावा याचे प्रात्यक्षिक दिले.शेवटी निलेश पारसकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
إرسال تعليق