खामगावत मुसळधार : 24 तासात तीन इंच बरसला
जनोपचार न्यूज नेटवर्क :- गेल्या 24 तासात काल सकाळी 8 वाजता पासून तर आज सकाळी 8 वाजेपर्यंत खामगावात ६६ मिलिमीटर म्हणजे सुमारे तीन इंच पाऊस बरसला. आज सकाळपासून सतत पाऊस सुरू असून सकाळी मुसळधार पाऊस झालेला आहे.
![]() |
जाहिरात |
आज सकाळपर्यंत खामगावात या वर्षी एकूण 360 मिलिमीटर पाऊस म्हणजे जवळपास 14 इंच पाऊस या 1 जून पासून आतापर्यंत नोंदविला गेला आहे.
महाराष्ट्र सरकार 7 जून पासून पावसाची नोंद घेते त्यामुळे त्यांच्या कालच्या नोंदीनुसार सुमारे 12 इंच पाऊस झाला, हा फरक असला तरी खामगाव कॉटन मार्केटने घेतलेल्या नोंदीनुसार आज पर्यंत 15 इंच पाऊस खामगावात झाला आहे.
إرسال تعليق