हनिषा ने स्वतःच्या वाढदिवसाला केले वृक्षारोपण


खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क:-  आपत्ती येण्यापुर्वीच मानवाने मोठया प्रमाणात वृक्षारोपण करून निसर्गाला सहकार्य करने काळाची गरज असल्याचे सांगत खामगाव येथील चिमुकल्या हनिषा भावेश खंडेलवाल हिने वर्षभर एका आंब्याच्या रोपटयाचे संगोपन करीत तब्बल वर्षभरानंतर १ जुन रोजी वृक्षारोपण केले. आणि याच माध्यमातुन तिने वृक्षारोपणाचा एक सुंदर संदेश दिल्यामुळे चिमुकल्या हनिषा च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केल्याजात आहे

                   खामगाव येथील सत्तीफैल परिसरातील वर्ग ५ ची विद्यार्थीनी हनिषा भावेश खंडेलवाल हिने आपले आजोबा ओमप्रकाश खंडेलवाल यांना वर्षभरापूर्वी सोबत घेऊन एका आंब्याची कोय कुंडीमध्ये पुरली. ती रोज त्या कुंडीत पाणी टाकायची आणि काही दिवसातच त्या कुंडीतून आंब्याचे छोटेसे रोपटे निघाले. यानंतर हनिषा ने त्या रोपटयाला रोज पाणी टाकत त्याचे वर्षभर संगोपण केले. आणि १ जुन २०२४ रोजी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक आठवण म्हणून त्या रोपटयाचे वाघली हनुमान मंदीरात जाऊन विधीवत वृक्ष पुजनानंतर त्या रोपट्याचे मंदीर परिसरात कुटुंबीयांसह वृक्षारोपण केले. आणि याच माध्यमातुन तिने वृक्षारोपणाचा एक सुंदर संदेश दिल्यामुळे चिमुकल्या हनिषा च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केल्याजात आहे.



Post a Comment

أحدث أقدم