दोघा भावांना लागला विद्युत चा शोक
एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर दुसरा गंभीर
![]() |
मृतक मधुकर चव्हाण...,........जखमी सुधाकर चव्हाण |
खामगाव प्रतिनिधी:- विद्युत मोटर दुरुस्तीचे काम करीत असताना दोघा भावांना विद्युतचा शॉक लागला .या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरा गंभीर झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील ग्राम श्रीधर नगर येथे आज दुपारी घडली.
समजलेल्या माहितीनुसार श्रीधर नगर येथील मधुकर चव्हाण व सुधाकर चव्हाण हे दोघे विद्युत मोटर दुरुस्तीचे काम करीत होते दरम्यान या दोघांनाही विद्युत प्रवाहित तारांचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली त्यामध्ये मधुकर चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर भाऊ सुधाकर चव्हाण यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्युत कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याची ओरड ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे तात्काळ वीज कर्मचारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. वृत्तलेपर्यंत कारवाई सुरू होती
إرسال تعليق