८ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! आरटीई च्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कधी मिळणार ?- गणेशभाऊ चौकसे यांचा सवाल
खामगाव प्रतिनिधी: येत्या एक जुलैपासून शाळा सुरू होणार असून अद्यापही आरटीई बाबत काही निर्णय लागला नाही. न्यायालय आणि शासन यांच्यामुळे राज्यातील ८ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून यावर लवकरच तोडगा काढावा अशी मागणी गणेशभाऊ चौकसे यांनी केली आहे. शिक्षण हक्क कायद्याने मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविणे सुरू केले आहे.
![]() |
जाहिरात |
सुरुवातीला आरटीई च्या निकषात बदल केल्याने पालक वर्गांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. ही प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत असून ७ जून रोजी पुणे येथे सोडत काढण्यात आली.मात्र निवड यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत. याबाबत शासनाकडे माहिती घेतली असता शासनाने आपल्या जबाबदारी झटकून टाकली व न्यायालयाचा निर्णय झाला नाही म्हणून आम्ही काही करू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे तरी शासन झोपून आहे.करोडो रुपये जाहिरातीवर खर्च होतात तर अरोबो रुपयांचे कर्ज बुडत आहे. कितीतरी शासनाच्या योजना तोट्यात चालतात. अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार होते. आमदार खासदारांचे पगार वाढविण्यासाठी अर्ध्या तासात बिल पास केले जाते.हे सर्व होत असताना जे देशाचे भविष्य विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्यासाठीच निर्णय घेता येत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे भारत देश कसा प्रगत होईल. निवडणुकीत फक्त मतदार बांधवांना आश्वासन द्यायचे व निवडून आल्यानंतर विसरून जायचे. यामुळे जनतेचा विश्वासघात होतो.तरी जातीपातीचे राजकारण बंद करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष असावे. आरटीई मध्ये विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया राबवून त्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी करून द्या जर शासन मूलभूत गरज आहे पूर्ण करू शकत नाही तर जनतेने कोणाकडे पाहावे. प्रत्येक विषयासाठी जनतेने आंदोलन करायला पाहिजेत का असा प्रश्न उपस्थित करून आरटीई अंतर्गत निवड यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावे अशी मागणी गणेशभाऊ चौकसे यांनी केली आहे.
إرسال تعليق