श्री संत भोजने महाराज दिंडीचे उद्या पंढरपूर कडे प्रस्थान

खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क:- श्री संत सदगुरु भोजने महाराज यांच्या पालखीचे उद्या 26 जून रोजी सकाळी 8 श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे.  

     खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर अध्यक्ष असलेले खामगांव तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी ता.खामगांव येथून आषाढी एकादशी निमीत्य मागील 16 वर्षापासून पंढरपूरकडे पायदळ वारी दिंडी जात असते. या दिडींत अटाळी व पंचक्रोशीतील वारकरी विठठलाचा जयघोष करीत पंढरपूरला जातात. 

सदरची दिंडी उद्या बुधवार .26जून रोजी सकाळी 8 वाजता श्री क्षेत्र विठठल रुख्माई सदगुरु भोजने महाराज संस्थान येथून प्रस्थान करणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी श्री संत भोजने महाराज पालखी रथातून पंढरपूरकडे जाणार आहे.     सदरची दिंडी देऊळगांव साकर्शा, जानेफळ,मेहकर, लोणार,तळेगांव, गेवराई, साटोणा, आष्टी,सादोळा, पातृड, कळंब, येरमाळा,जामगांव, खांडवी,भोसारे, या मार्गे पंढरपूर येथे दि.3 जुलै 2024रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे. या दिंडीत शेकडो भाविक पायदळ वारीत सहभागी होत आहे

Post a Comment

أحدث أقدم